प्रयोग कॉम्प्युटर्स

प्रयोग कॉम्प्युटर्स

प्रदीप तांबे संस्थापक
लोड होत आहे
प्रयोग कॉम्प्युटर्स

वेबसाइट व वेब ॲप

व्यवसायासाठी कस्टम वेबसाइट आणि ॲडमिन पॅनेलसह वेब ॲप.

वेबसाइट फक्त ऑनलाइन दिसण्यासाठी नाही, तर ग्राहकांचे कॉल आणण्यासाठी असावी. आम्ही अशी वेबसाइट बनवतो जी तुम्ही स्वतः अपडेट करू शकता — उत्पादने, किंमती, फोटो आणि संपर्क तपशील — सोप्या ॲडमिन पॅनेलमधून.

आम्ही काय बनवतो

  • दुकान, क्लिनिक, शाळा आणि सेवा व्यवसायासाठी वेबसाइट
  • व्हॉट्सॲप चौकशी बटणासह उत्पादन कॅटलॉग
  • बुकिंग, तक्रार, बिलिंग किंवा कर्मचारी नोंदीसाठी वेब ॲप
  • एकाच वेबसाइटची मराठी, हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती

काम कसे चालते

ग्राहकांनी वेबसाइटवर काय करावे — कॉल, भेट, बुकिंग की खरेदी — हे आधी समजून घेतो. मग पेजेसची रचना, डिझाइन, मजकूर आणि मोबाईलवर तपासणी करून वेबसाइट सुरू करतो.

सुरू झाल्यानंतर

गूगल सर्च कन्सोल आणि ॲनालिटिक्स सेट करून देतो, जेणेकरून भेट देणारे कुठून येतात हे तुम्हाला दिसेल. बदल आणि होस्टिंगसाठी आम्ही उपलब्ध असतो.

दुकानात या किंवा आत्ताच संपर्क करा

पत्ता
कॅनॉट प्लेस, सिडको, छत्रपती संभाजीनगर - 431001, महाराष्ट्र
वेळ
सोम–शनि, सकाळी १० – रात्री ८

तुमचा नंबर फक्त तुम्हाला उत्तर देण्यासाठी वापरला जाईल.